महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जून । करोना नियंत्रण आणि सावरणार अर्थव्यवस्था यामुळे गुंतवणूकदारांनी कमॉडिटीमधून पैसे काढून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीममध्ये गेल्या आठवड्यात घट झाली होती. आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. मागील तीन सत्रात सोने ९५० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. यामुळे ग्राहकांसाठी खरेदीची संधी आहे.
सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स) सोन्याचा भाव ४८५३५ रुपये आहे. त्यात ३८७ रुपयांची घसरण झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ७१८२६ रुपये असून त्यात ४०५ रुपयांची घसरण झाली आहे.
दरम्यान, मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये शुक्रवारी सोन्याचा भाव ४८८८० रुपयांवर स्थिरावला होता. त्यात ३१८ रुपयांची घसरण झाली होती. दुसऱ्या बाजूला चांदीच्या किमतीत वाढ झाली. बाजार बंद होताना एक किलो चांदीचा भाव ७२२१६ रुपयांवर स्थिरावला. त्यात २१७ रुपयांची वाढ झाली होती. त्याआधी गुरुवारच्या सत्रात सोन्यामध्ये २५० रुपयांची घसरण झाली होती. असे सलग तीन सत्रात सोनं ९५० रुपयांनी स्वस्त झाले आहे.
Goodreturns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७७२० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेटचा भाव ४८७२० रुपये आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७८८० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५२१८० रुपये झाला आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४५७५० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९९०० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८४८० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५११८० रुपये आहे.