महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जून । जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर गडगडल्याच्या पार्श्वभूमीवर देशातही सोन्याचे दर उतरले आहेत. एमसीएक्स वायदे बाजारात सोन्याचे तोळ्याचे अर्थात प्रती 10 ग्रॅमचे दर 48 हजारांच्या खाली आले आहेत तर दुसरीकडे चांदीचे प्रती किलोचे दरदेखील 70 हजार रुपयांपर्यंत खाली उतरले आहेत.
अमेरिकन फेडरल रिझर्व्हने वर्ष 2023 मध्ये दोनवेळा व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. याच्या परिणामी जागतिक बाजारात सोन्याची सपाटून विक्री झाली. सोन्याचे प्रती औंसचे दर 1815 डॉलर्सपर्यत खाली आले. भारतीय बाजारावर याचा परिणाम होत सोन्याचे तोळ्याचे 47 हजार 440 रुपयांपर्यंत खाली आले. सोन्याच्या दरातली ही घसरण आठशे रुपयांपेक्षा जास्त होती. तत्पूर्वी वायदे बाजारात सोन्याचे दर 47 हजार 799 रुपयांवर उघडले होते. चांदीचे दर देखील घसरून 70 हजार 300 रुपये प्रती किलोवर आले आहेत.