Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131 निर्जला एकादशीसाठी पंढरी सजली! विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, - Maharashtra 24
महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. २१ जून – आज ज्येष्ठ शुद्ध अर्थात नीर्जला एकादशी. ज्येष्ठ शुद्ध अर्थात निर्जला एकादशीनिमित्त विठुरायाची रावुळी रंगीबेरंगी फुलांनी सजली . नीर्जला एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. पुणे येथील भाविक सचिन चव्हाण आणि संदीप पोकळे यांनी ही फुलांची सेवा दिली आहे. गुलाब, गुलछडी, झेंडू, ओरकेट, पिंक डीजे, कामिनी अशा विविध प्रकारच्या रंगीबेरंगी पाना-फुलांनी विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठोबा-रखुमाईचा गाभारा, चौखांबी, सोळखांबी येथे ही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.