काईल जॅमिसनचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच ; विराटसह करोडो भारतीयांच्या स्वप्नांचा चक्काचूर!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जून । विराट कोहलीचं (Virat kohli) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (ICC WTC Final 2021) जिंकण्याचं स्वप्न भंगलं, किवींनी आठ विकेट्सने भारताला लोळवलं. भारताने न्यूझीलंडला 139 धावांचं माफाक आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडने हे आव्हान अगदी सहज पूर्ण केलं. तत्पूर्वी न्यूझीलंडने बोलिंगमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. ट्रेंट बोल्ट, टीम साऊथी, नील वॅगनर, काईल जॅमिसन आणि कॉलीन डी ग्रँडहोम या किवींच्या बोलिंग आक्रमणापुढे भारत घायाळ झाला. या सगळ्यांपैकी भारतीय फलंदाज एका गोलंदाजासमोर चाचपडताना खेळले. तो गोलंदाज आहे विराटच्या आयपीएल संघातील काईल जॅमिसन (Kyle Jamieson)… काईलचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. भारतीय कर्णधार कोहलीला जर त्याने दोन्ही डावांत तंबूचा रस्ता दाखवला. न्यूझीलंडसाठी त्यानेच तर विजयाचा पाया रचला, असं म्हणावं लागेल… कारण त्याने पहिल्या डावांत टाकलेला अफलातून स्पेल आणि दुसऱ्या डावांत भारताला दिलेले धक्के… जॅमिसनची WTC अंतिम सामन्यातली उत्कृष्ट कामगिरी इथून पुढची काही वर्ष स्मृतीत राहिल. (WTC Final 2021 India vs New Zealand Kyle Jamieson Fantastic Performance)

काईल जॅमिसनने भारताची बोलती बंद केली!
काईल जॅमिसन याने या सामन्यात सात विकेट्स घेतल्या. त्याने पहिल्या डावात 31 धावा देऊन पाच फलंदाजांना तंबूत धाडलं. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत, ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. पहिल्या डावात जॅमिसनने टिच्चून गोलंदाजी करत भारताचा निम्मा संघ माघारी धाडला. भारताला मोठ्या नुकसानीला सामोरे जावं लागलं. या संपूर्ण सामन्यात पाच विकेट घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. दुसऱ्या डावातही त्याने चमकदार कामगिरी केली एकापाठोपाठ एक ओव्हर फेकताना त्यांने विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या दोन मोठ्या माशांना आपल्या जाळ्यात अकडवलं. हे दोन बॅट्समन लवकर आऊट झाल्यामुळे भारताला मोठा स्कोर करता आला नाही परिणामी भारताचा ड्रॉ चा ऑप्शन देखील संपला आणि भारताला पराभवाच्या छायेत जावं लागलं.

बॅटिंगमध्येही कमाल
काईल जॅमिसनने बॅटिंगमध्येही आपली जादू दाखवली. पहिल्या डावात त्याने निर्णयक 21 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला 32 धावांची लीड मिळाली आणि तीच लीड न्यूझीलंडसाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरली. मॅचच्या निकालानंतर हे सगळ्यांना प्रकर्षाने जाणवलं की त्याने 21 धावा केल्या नसत्या तर न्यूझीलंड 32 गावांची लीड मिळाली नसती. तर सामन्याचा निकाल काही वेगळाही लागू शकला असता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *