शेतकऱ्यांना सुगीचे दिवस ; सोयाबीनला ‘अच्छे दिन’, इतिहासातला उच्चांकी दर,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जून । वाशिम जिल्ह्यात खरिपात एकूण क्षेत्रापैकी 80 टक्के सोयाबीनची शेती केली जाते. मात्र सोयाबीनला पाहिजे तसा दर मिळत नव्हता. यंदा मात्र सोयाबीनला उच्चांकी दर मिळत असून, 9 हजार 500 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. त्यामुळं सोयाबीन उत्पादक शेतकरी समाधानी आहे. (Soyabean prices Up in Washim 9500 per quintal)

पश्चिम विदर्भातील सोयाबीनची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन दिवसापासून चांगले दर मिळत आहेत. शासकीय आधारभूत किंमत 3 हजार 880 रुपये असताना प्रत्यक्षात मात्र दर नऊ हजार पार गेले आहेत. त्यामुळं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत.

इतिहासात पहिल्यादांचं सोयाबीनला 9 हजार 500 रुपयांचा दर
सोयाबीनचा हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरु होतो. मात्र त्यावेळी सोयाबीनला 3 हजार 500 ते 4 हजार पर्यंत दर होता. आता सोयाबीनला इतिहासात पहिल्यादांचं 9 हजार पार दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहे. मात्र हे दर 2021 चा हंगामात ही कायम राहावे अशी अशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

सोयाबीनला उच्चांकी दर, शेतकरी वर्गात समाधान
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील तीन ते चार दिवसांत सोयाबीनला 9 हजार पाचशे रुपये दर मिळत शेतकरी समाधानी असल्याचं बाजार समिती उपनिरीक्षक वामन सोळंके यांनी सांगितलंय. चांगला दर मिळत असल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे.

यंदा सोयाबीनचे दर कडाडले आहेत. प्रति क्विंटल 9500 च्या वर गेले आहेत. हे दर आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीर पोहोचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *