देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो धावणार; दीड तासाचा प्रवास 13 मिनिटांत होणार,

Spread the love

महाराष्ट्र २४- देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो धावणार; दीड तासाचा प्रवास 13 मिनिटांत होणार,कोलकाता येथे आता अंडरवॉटर मेट्रोसाठी काम सुरू आहे. ट्रेनमधील प्रचंड गर्दीमुळे तसेच वाढत्या ट्रॅफिकमुळे नागरिक सध्या मेट्रो किंवा मोनो रेल्वेचा वापर करतात. त्यामुळेच मेट्रोचे जाळे विस्तारण्याचा प्रयत्न सुरू आहेत. त्यात येणारे विविध अडथळे तंत्रज्ञानाच्या जोरावर दूर करून विकासाची कामे करण्यात येत आहे. या मेट्रो प्रवासासाठी दोन कि.मी करता 5 रू, पाच कि.मी करता 10 रू, 10 कि.मी करता 20 रू आणि शेवटच्या स्टेशन पर्यंत 30 रू भाडे आकरण्यात येणार आहे. मेट्रोत प्रवाशांकरता अत्याधुनिक सेवा मिळणार आहे.

मेट्रो रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी इंद्राणी बॅनर्जी यांनी सांगितले की, पूर्व-पश्चिम मेट्रो ही देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो आहे. कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशन लवकरच हुगळी नदीतून मेट्रो चालवणार आहे. सध्या या मेट्रोचे काम खूपच वेगाने सुरू आहे. या मेट्रोचे काम मार्च 2020 पर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. या मेट्रोचा कोलकाताच्या नागरिकांना खूपच फायदा होणार आहे. तब्बल दीड तासचा प्रवास या मेट्रोमुळे  13 मिनिटांत पूर्ण होईल

देशातील सर्वात पहिली मेट्रो सेवा असणारे शहर म्हणून कोलकाता ओळखले जाते. तिथे पहिली मेट्रो सेवा 1984 मध्ये सुरू झाली होती. आज 13 फेब्रुवारी रोजी रेल्वे मंत्री पियुष गोयल पूर्व-पश्चिम मेट्रो सेवेला हिरवा कंदिल दाखवून सेवेला सुरुवात करणार आहे. तसेच प्रवासी शुक्रवारी 14 फेब्रुवारी रोजी मेट्रोच्या गारेगार प्रवासाचा आनंद घेऊ शकता. अर्थात हा या मेट्रोचा पहिला टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून मार्च 2020 मध्ये दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण होण्याची शक्यात आहे. या दुसऱ्या टप्प्यातच पाण्यातून एक कृत्रिम बोगदा तयार करण्यात येणार असून त्यामधून मेट्रो धावणार आहे.

मेट्रो रेल्वेचा हा संपूर्ण मार्ग 15 किलोमीटरचा असणार आहे. या रेल्वेचा पहिला टप्पा हा 6 कि.मी चा असेल आणि याची आज सुरुवात करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *