हृतिक रोशन पुन्हा एकदा होणार सुपरहिरो… ‘क्रिश ४’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जून । सुपरहिरो सिनेमा अर्थात ‘क्रिश’ला आता प्रदर्शित होऊन १५ वर्षं पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं अभिनेता हृतिक रोशन याने या सिनेमाच्या सीरिजमधल्या चौथ्या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांसमोर आणला. गेल्या दोन वर्षांपासून ‘क्रिश ४’ या सिनेमाची बीटाऊनमध्ये चर्चा आहे.

पण गेल्या वर्षी करोनाच्या संकटामुळे सिनेमाच्या पूर्व-निर्मितीचं काम थांबलं होतं. पण आता स्वतः हृतिकनं या सिनेमाची घोषणा केल्यानं प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. त्यानं सोशल मीडियावर ‘क्रिश ४’चा टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत त्यानं ‘भूतकाळात जे घडलं ते घडलं. चला भविष्यात काय घडते ते पाहू या.. क्रिश ४’ या आशयाची कॅप्शन दिली आहे. तसंच क्रिशला १५ वर्षं पूर्ण झाल्यानं सर्व प्रेक्षकांचे आणि चाहत्यांचे आभारदेखील मानले आहेत.

https://www.instagram.com/hrithikroshan/?utm_source=ig_embed&ig_rid=d8e327fe-0848-4e98-98c9-afa0c738b22c

हृतिकनं २००३ मध्ये ‘कोई मिल गया’ या चित्रपटात सुपरहिरो साकारला. त्याचे वडील राकेश रोशन यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यानंतर २००६ मध्ये ‘क्रिश’ आणि २०१३ मध्ये ‘क्रिश ३’ हे चित्रपट आले. चाहत्यांचा त्याला प्रतिसादही मिळाला. २०१७ मध्ये चित्रपटाच्या चौथ्या भागावर काम करायचा निर्णय हृतिकनं घेतला. मात्र, हे काम काही पुढे गेलं नाही. त्यानंतर हृतिकनं ‘मोहेंजोदडो’, ‘काबील’, ‘सुपर ३०’ आणि आता ‘वॉर’ हे चित्रपट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *