चिंताजनक ; पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोना हॉट-स्पॉट गावांच्या संख्येत वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जून । पुणे जिल्ह्यातील (Pune District ) ग्रामीण कोरोना संसर्ग (Coronavirus) आटोक्‍यात येत नसून, पंधरा दिवसांपूर्वी कमी झालेली हॉटस्पॉट (Hotspot) गावांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या 13 तालुक्‍यांत एकूण 91 हॉटस्पॉट गावे आहेत. त्यामध्ये खेड,आंबेगाव,जुन्नर आणि पुरंदर तालुक्‍यात सर्वाधिक हॉटस्पॉट संख्या आहे. ज्या गावात दहापेक्षा जास्त करोना बाधित रुग्ण आहेत, ती गावं हॉटस्पॉट म्हणून जाहीर कले जाते.

मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून ग्रामीण भागातील बाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे महिनाभरात ही संख्या आणखीन कमी होईल, या आशेने आरोग्य विभागही निवांत झाले होते पण हॉटस्पॉट संख्या कमी होण्याएवजी त्यामध्ये आता वाढ झाली आहे.

मागील बारा दिवसांपूर्वी हॉटस्पॉट गावांची संख्या आंबेगाव, खेड तालुक्‍यात 4 ने हॉटस्पॉट गावांची संख्या वाढलेली दिसत आहे. तर जुन्नरमध्ये आणि पुरंदरमध्येही प्रत्येकी 5 ने वाढ झाली आहे. तर मावळ, हवेली, शिरूर, वेल्हा तालुक्‍यात हॉटस्पॉट संख्येत घट झाल्याचे दिसून येते आहे.

21 जून रोजी पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय हॉटस्पॉट गावांची संख्या

बारामती – 9, दौंड – 6, मावळ – 7, हवेली – 9 , खेड – 13, आंबेगाव – 10, जुन्नर – 16, शिरूर – 4, पुरंदर – 10, इंदापूर – 2, मुळशी – 3, भोर -1, वेल्हा – 1.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *