Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
कॅनडात तापमानाचा पारा ४९ अंश सेल्सिअसवर; १३० जणांचा मृत्यू - Maharashtra 24

कॅनडात तापमानाचा पारा ४९ अंश सेल्सिअसवर; १३० जणांचा मृत्यू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जून । कॅनडामध्ये तापमानाचा पारा चक्क ४९.५ अंश सेल्सिअसवर पोहचला. या भीषण उन्हाळ्यामुळे कॅनडामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. शुक्रवारपासून वँकूवर शहरात आतापर्यंत १३० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामध्ये वृद्धांची संख्या अधिक आहे. मृतांपैकी अनेकांची प्रकृती बरी नव्हती. मात्र, वाढलेल्या तापमानामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले जात आहे.

मंगळवारी कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया भागात सातत्याने तिसऱ्या दिवशीही ४९.५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. याआधी इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली नव्हती. उत्तर-पश्चिम अमेरिका आणि कॅनडामध्ये उच्च दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने उष्ण वातावरण तयार झाले आहे. वँकूवरमधील ६५ जणांच्या मृत्यूचे कारण वाढलेले तापमान असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

उपनगर बुर्नबेमध्ये कमीत कमी ३४ आणि सरेमध्ये ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. वँकूवरमध्ये इतक्या तापमानाची नोंद कधीही झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या भीषण उन्हापासून वाचण्यासाठी अनेक उपाय सुरू आहेत. घराबाहेरही पडणे लोकांसाठी कठीण झाले आहे.

दरम्यान, अमेरिका पॅसिफिक उत्तर-पश्चिम भागातही दिवसाचे तापमान ४४ अंश सेल्सिअस इतके झाले होते. हवामान विभागाने हे तापमान असामान्य, धोकादायक असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *