Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक ३१ जुलैपर्यंत बंदच राहणार - Maharashtra 24

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक ३१ जुलैपर्यंत बंदच राहणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जून । कोरोनाचे संकट कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर नियमित आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर असलेली बंदी ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. हवाई वाहतूक महासंचलनालय अर्थात डीजीसीएकडून बुधवारी ही माहिती देण्यात आली.

नियमित हवाई वाहतुकीवर बंदी असली तरी गरजेनुसार आवश्यक त्या देशांसाठी विमान सेवा चालविली जाईल, असे डीजीसीएने स्पष्ट केले आहे. कोरोना संकटाला गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात सुरुवात झाली होती. त्यावेळी सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर २३ मार्च रोजी बंदी घालण्यात आली होती. तेव्हा घालण्यात आलेल्या बंदी वेळोवेळी वाढविण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *