महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ जुलै । कोरोनाचे संकट त्यात टाळेबंदी , महागाईमुळे सर्वसामान्यांना जगायचं कसं असा प्रश्न पडलाय. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने कष्टकरी कामगार यांच घरचं आर्थिक गणितच बिघडून गेलंय. अशाच गरजू कष्टकरी कामगार, अंध, निराधार, अपंग बांधवांसाठी पिंपरी-चिंचवड शहरात अन्न वितरण सेवा पुरविणारे महाराष्ट्र फेरीवाला क्रांतीकारी महासंघ व वर्किंग पिपल चार्टर याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “चार घास सुखाचे ” या कार्यक्रमात सहभाग घेतांना मि त्यांचे काम काज व कार्यपद्धतीवर प्रभावित झालो.
अन्न शिजवण्या पासून ते त्याची पॅकिंग ते वाटपा पर्यंत सर्व रूपरेषा समजून घेतली.कोरोना महामारी आपले आपल्याला उमजत नाही. अशा परिस्थितीत 39 दिवसापासून अन्न दान करणारे हे कोरोना योद्धे रोज न चूकता गरजूंना अन्नदान करीत असतात. अध्यक्षांसह त्यांच्या संपूर्ण टिमला खूप खूप शुभेच्छा……. छायाचित्रात डावी कडून महाराष्ट्र फेरीवाला महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय काशीनाथभाऊ नखाते, बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय प्रतापराव गुरव यांच्यासह उपस्थित सहकारी व कष्टकरी बांधव… पि. के. महाजन