महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ जुलै । आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी परतल्यामुळे आणि रुपयात आलेल्या कमजोरीमुळे भारतीय सराफा बाजारात 1 जुलै रोजी सोन्याचा दर (Gold Price Today) चांगला वाढला आहे. चांदीच्या किंमतीतही (Silver Price Today) आज मोठी तेजी आली आहे. आधीच्या सत्रात सोन्याचे दर दिल्लीतील सराफा बाजारात 45,784 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. तर चांदीचे दर प्रति किलो 67,423 रुपयांवर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात आज काही प्रमाणात तेजी पाहायला मिळाली तर चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव 526 रुपयांनी वाढला आहे. या वाढीनंतर दिल्लीमध्ये 99.9 शुद्धतेच्या सोन्याचा नवा भाव 46,310 रुपये प्रति तोळा झाला आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ होऊन दर 1,778 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. रुपयाचे मुल्य आज डॉलरच्या तुलनेत पाच पैशांनी कमजोर होऊन 74.37 च्या स्तरावर पोहोचले होते.
चांदीचा लेटेस्ट भाव (Silver Price, 1 July 2021)
चांदीच्या किंमतीतही आज चांगली तेजी पाहायला मिळाली. दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी चांदीच्या दरात 1231 रुपयांची वाढ झाली आहे. या जबरदस्त तेजीनंतर चांदीचे दर 68,654 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात विशेष बदल झालेले नाहीत. याठिकाणी चांदीचे दर 26.25 डॉलर प्रति औंस आहेत.