महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ जुलै । हिंदुस्थानात इलेक्ट्रिक वाहनांबाबत कंपन्या खूप सक्रिय झाल्या आहेत. यामुळेच आपल्याला देशात नवनवीन इलेक्ट्रिक वाहने लाँच होताना दिसत आहेत. आता अशीच एक नवीन इलेक्ट्रिक बाईक Gravton Quanta हिंदुस्थानात लॉन्च झाली आहे. ही मेड इन इंडिया बाईक आहे. आज आपण याच बाईक बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
Gravton Quanta मध्ये BLDC मोटर देण्यात आली आहे. जी 170Nm टॉर्क जनरेट करते. ही मोटर 3KW Lio-ion बॅटरीसह येते. एकदा बॅटरी संपूर्ण चार्ज झाल्यास ही बाईक 150 किमीचा पल्ला गाठते. याची टॉप स्पीड 70 किमी प्रतितास इतकी आहे. यात तुम्ही एकसोबत दोन बॅटरीही जोडू शकता. ज्यामुळे तुम्हाला एकाच वेळेत 320 किमीचा पल्ला गाठता येऊ शकतो.
ही बाईक रेड, व्हाईट आणि ब्लॅक या तीन रंग पर्यायासह लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीने या बाईकची किंमत 99,000 रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.