शेअर मार्केट ; महिन्याभरापासून अपर सर्किट, ‘या’ शेअरने वर्षभरात 1 लाखाचे केले 45 लाख

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 15 जुलै । शेअर मार्केट सध्या विक्रमी स्तरावर असून अनेक कंपन्यांचे शेअर तुफान पळत आहेत, परंतु गुंतवणूकदारांचे सध्या लक्ष वेधून घेतले आहे ते बिहारच्या आदित्य व्हिजन (Aditya Vision) या कंपनीने. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची होलसेल विक्री करणाऱ्या या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या महिन्याभरापासून अपर सर्किट लागले आहे.

आदित्य व्हिजन कंपनीचा शेअर आजही 5 टक्के पळाला असून एका शेअरची किंमत सध्या 960.45 रुपये झाली आहे. गेल्या सहा महिन्यात हा शेअर 2410 टक्के तर वर्षभरात 4562 टक्के वाढला आहे. 8 जुलै 2020 रोजी या शेअरची किंमत 20.60 पैसे होती. याचाच अर्थ गेल्या वर्षी ज्या लोकांनी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील त्यांचे आता 45 लाख 62 हजार रुपये झाले असतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *