Maharashtra SSC Result : प्रतीक्षा संपली ; दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, दुपारी 1 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 15 जुलै । दहावीचा निकाल ( SSC Result 2021)उद्या जाहीर होणार आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा निकाल यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा लागला आहे. उद्या दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देण्याचा शासन निर्णय शिक्षण विभागाने घेतला. यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे निकष सुद्धा ठरवले होते. या मूल्यमापनाच्या आधारे उद्या दहावीचा निकाल दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे.

लॉकडाऊनमुळे दहावी बारावीचे निकाल लांबणीवर पडले आहेत. मात्र दहावीच्या निकालाची आता प्रतीक्षा संपली आहे. आता बारावीचे विद्यार्थी आणि पालकही निकालाची वाट पाहत आहे. यावर्षी दहावीच्या परिक्षेसाठी एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 9 लाख 9 हजार 931 मुले तर 7 लाख 48 हजार 693 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आता या परीक्षेचा उद्या निकाल लागणार आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *