येत्या काळात रोजगार संधींसाठी युवकांना Digital Skills ची आवश्यकता ; Work From Home ला प्राधान्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुलै । गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोनाचा (Corona) कहर जगातील अनेक देशांमध्ये सुरु आहे. त्यामुळे सरकारकडून लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लावले जात आहेत. परिणामी उद्योग-व्यवसाय अडचणीत आले आहेत. नोकऱ्या (Jobs) किंवा रोजगारावर (Employment) याचा थेट परिणाम झाला असून, अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. दुसरीकडे या सर्व स्थितीमुळे बहुतांश कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचं (Work From Home) धोरण स्वीकारले आहे. कोरोनाची सद्यस्थिती पाहता वर्क फ्रॉम होम ही संकल्पना अजून बराच काळ राबवावी लागण्याची शक्यता आहे. कामाच्या एकूण पध्दतीत बदल होत असताना नवनवीन कौशल्ये (Skills) आत्मसात करणं हे सर्वांसाठीच काळाची गरज बनली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जागतिक युवक कौशल्य दिनानिमित्ताने व्याख्यान दिलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नवी कौशल्यं काय असतील, ती कशी आत्मसात करावी लागतील याचा वर्ल्ड युथ स्किल्स डे च्या (World Youth Skills Day) निमित्ताने आढावा घेण्यात आला आहे.

सध्या कोरोनामुळे वर्क फ्रॉम होमला प्राधान्य दिलं जात असून, या स्थितीत अजून काही कौशल्यं विकसित करणं आवश्यक आहे. या अनुषंगाने कंपन्या कौशल्य विकसित करण्याला महत्व देताना दिसत आहेत. फोर्ब्सच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, जगातील 20 ते 30 टक्के नोकऱ्या या कायमस्वरुपी वर्क फ्रॉम होम या संकल्पनेत शिफ्ट होऊ शकतात. लवकरच टेलिकॉम कंपन्या 5G सेवा सुरु करणार आहेत. त्यानंतर हा आकडा 30 ते 40 टक्क्यांवर पोहोचू शकतो. त्यामुळे जगातील 84 टक्के कंपन्या आपलं कामकाज वेगात व्हावं यासाठी वेगात डिजीटलीकरण (Digitalisation) करुन घेण्यात व्यस्त आहेत. परंतु, या पध्दतीच्या नोकऱ्या मिळवण्यासाठी उमेदवारांना नवी कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज भासणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *