पोटाचा घेर वाढतोय ; त्रस्त झालात ? हा उपाय करून पहा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुलै । वजनवाढीची समस्या (Weight Problems) कित्येक जणांना भेडसावत असते. दैनंदिन शरीराच्या हालचालींमध्ये किंवा आहारात (Diet) झालेल्या बदलांमुळे वजनावरील नियंत्रण सुटून वजन बेसुमार वाढू लागते. जिम (Gym), व्यायाम सगळं करूनही वजन कंट्रोलमध्ये येत नसेल तर तुम्ही एका गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहात. ती गोष्ट म्हणजे आहार होय. जोपर्यंत तुम्ही पौष्टिक आहार घेणार नाही तोपर्यंत तुमच्या शाररिक व्यायामाचा वजन कमी करण्यावर म्हणावा तितका परिणाम होताना दिसणार नाही. वजन कमी करण्यासाठी हेल्दी डाएटमध्ये (Healthy Diet) आलं-लिंबाचा रस (Ginger Lemon Juice) या हेल्दी ड्रिंकचे सेवन करण्यास सुरूवात करा, जे तुमचे शरीर निरोगीही ठेवेल आणि शरीरातील फॅट्सवरही नियंत्रण ठेवेल. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

सकाळी उठल्यावर आलं-लिंबाचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि आपलं शरीर डिटॉक्सिफाय (Detoxify) होतं. त्यामुळे हे वजन कमी करण्यासाठीचे हेल्दी ड्रिंक (Healthy Drink) मानले जाते. पण यासह आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या आहारात कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ कमी आणि प्रोटीनयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात असायला हवेत.

आलं-लिंबाचं पेय बनवण्यासाठी आवश्यक सामग्री

-अर्धा लिंबू

-एक चमचा किसलेलं आलं

-स्वादानुसार साखर

कृती

सर्वप्रथम कोमट पाणी घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस (Lemon Juice) आणि किसलेलं आलं टाकून त्याचं नीट मिश्रण करा. त्यानंतर ते मिश्रण पाच मिनिटं तसंच ठेवून द्या. पाच मिनिटांनी त्या मिश्रणात साखर टाकून ते प्या. या पेयाची चव थोडीशी आंबट असते कारण त्यात लिंबू आहे आणि आलंही उग्र असतं त्यामुळेही चव आंबट किंवा उग्र लागू शकते. त्यासाठीच आपण यामध्ये साखर घालतो. पिऊन बघितल्यावर गरजेनुसार तुम्ही या पेयात मीठ-साखर घाला म्हणजे तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल.

लिंबू हे शरीरातील फॅट्स कमी करण्यासाठी उपयुक्त मानलं जातं. त्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं ज्यामुळे शरीरातील फॅट्स बर्न होण्यास मदत होते. तसंच लिंबाचं सेवन केल्यानं आपली इम्युनिटी पॉवरही (Immunity Power) वाढते. तर आल्यामध्ये असलेल्या गुणधर्मांचा सरळ परिणाम मेटॅबॉलिझमवर (Metabolism) होतो. मेटॅबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया. शरीरातील अन्न पचवण्याची क्रिया. अन्न व्यवस्थित पचलं तर फॅट्सवर नियंत्रण ठेवणं सोपं होतं. तसंच त्यामध्ये कॅलरीज नसतात, त्यामुळे त्याच्या सेवनानी शरीरावरील चरबीही वाढत नाही आणि वजनही नियंत्रित राहतं.

शरीरातील चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करणं अत्यंत गरजेचं असतं त्यामुळे नुसता आहार बदलून किंवा पेय पिऊन चरबी एकदम कमी होत नाही. त्यामुळे या हेल्थ ड्रिंकसोबतच व्यायाम करणंही तितकंच गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *