Petrol-Diesel 16 July : पेट्रोल पाठोपाठ डिझेलचे दर शंभरी गाठण्याच्या तयारीत ; जाणून घ्या, आजचे दर काय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जुलै । आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असून तेल कंपन्यांनी किमतींमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घट झाली आहे. देशभरात तेलाच्या किमतींनी सर्वच रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. पेट्रोलनं केव्हाच शंभरी ओलांडली आहे, तर डिझेलचे दर शंभरी गाठण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वी गुरुवारी पेट्रोलच्या दरात 35 पैसे आणि डिझेलच्या दरात 15 पैसे प्रति लिटरनं वाढ करण्यात आली होती. दिल्लीमध्ये आज पेट्रोल 101.54 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लिटरनं विकण्यात येत आहे.

देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत 29 मे रोजी पेट्रोलच्या दरानं पहिल्यांदाच शंभरी ओलांडली होती. तसेच गुरुवारी पेट्रोलच्या दरात वाढ होत, 107.54 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. तर डिझेलची किंमत 97.45 रुपये इतकी आहे. 4 मेनंतर पेट्रोलच्या दरात 40 वेळा वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात 37 वेळा वाढ करण्यात आली. या दरम्यान दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किमती 11.14 रुपये आणि डिझेलच्या किमती 9.14 रुपये प्रति लिटरची वाढ झाली आहे.

देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर :

 

शहरं     पेट्रोल          डिझेल
दिल्ली 101.54         89.87
मुंबई 107.54           97.45
बंगळुरू 104.94       95.26
पाटना 103.91         95.51
जयपूर 108.40        99.02
हैदराबाद 105.52      97.96
गंगानगर 112.90     103.15

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *