पावसाचे राज्यात जोरदार कमबॅक, धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुलै । अनेक दिवस दडी मारल्यानंतर पावसाने राज्यात जोरदार कमबॅक केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. मुंबईसह उपनगरात सकाळपासून वेगवान वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे मिठी नदी सध्या तुडुंब भरून वाहत आहे. मुंबईसोबतच राज्यातील जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची हवामान विभागाने वर्तवली आहे. मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पुणे

पुणे शहरात ढगाळ वातावरण
अधून मधून पडतायेत रिमझिम पावसाच्या सरी
रात्री शहरात झाला संततधार पाऊस
धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम

नाशिक –
अवघ्या काही तासांच्या पावसात त्रंबकेश्वर नगरी पाण्यात..
रात्री झालेल्या पावसाने नाल्याचं पाणी रस्त्यावर
अनेकांच्या घरात पाणी घुसलं
नगरपालिकेचे नाले सफाईचे दावे ठरले फोल
पावसाने सध्या घेतली उसंत

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच
पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल
पंचगंगा नदीचे पाणी पातळी 34 फूट 9 इंचावर
नदीची इशारा पातळी आहे 39 फुटावर तर धोका पातळी आहे 43 फुटांवर
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर पुराच पाणी
मांडुकली इथं कुंभी नदीच एक फूट पाणी
कोल्हापूर गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी बंद
गेळवडे धरणातील विसर्ग वाढल्यान बरकी गावात जाणार पूल पाण्याखाली
बरकी गावचा संपर्क तुटला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *