अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय ; अकरावी सीईटीची वेबसाईट बंदच

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुलै । शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला खरा. पण या परीक्षेसाठी नोंदणी सुरू झाल्यापासून सीईटीची वेबसाईटच बंद आहे. सलग दोन दिवसांपासून तांत्रिक अडचणीमुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना सीईटीच्या वेबसाईटवर नोंदणीच करता आलेली नाही. दरम्यान, सीईटीची वेबसाईट पुढील काही दिवस बंद राहण्याची शक्यता मंडळाकडून वर्तविण्यात आली आहे.

एसएससीसह सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये समान न्याय मिळावा यासाठी सीईटी प्रवेश प्रक्रिया घेण्याचा निर्णय राज्य मंडळाकडून घेण्यात आला. त्यानुसार 20 जुलैपासून सीईटी परीक्षेला नेंदणी करण्यासाठी वेबसाईटची लिंक उपलब्ध करून देण्यात आली. ही नोंदणी 26 जुलैपर्यंत करण्याची मुदत विद्यार्थ्यांना देण्यात आली, मात्र पहिल्या दिवसापासून सीईटीच्या लिंकला तांत्रिक अडचणीचा फटका बसला आहे. आतापर्यंत सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. आज दुसऱया दिवशी 16 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. दरम्यान, ही वेबसाईट तापूर्ती बंद आहे. सुरू होईल त्यावेळी विद्यार्थ्यांना कळविण्यात येणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *