Todays Gold Silver Price : सोन्याचे दर स्थिर, चांदीच्या दरात 400 रुपयांची वाढ

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुलै । सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात कोणताही बदल झाला नाही. मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव हा 47,870 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,870 रुपये इतका आहे. एकीकडे सोन्याचे दर स्थिर असताना चांदीच्या दरात मात्र 400 रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीसाठी आता 67,500 रुपये मोजावे लागणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत किरकोळ बदल होताना दिसत आहेत. गेल्या सहा दिवसांचा विचार करता सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर पुढचे तीन दिवस सोन्याच्या किंमती स्थिर राहिल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामधील गुंतवणूक कमी झाली आहे, तसेच डॉलरच्या किंमतीच्या बळकटीकरणाचा परिणाम सोन्याच्या मागणीवर नकारात्मक झाला असून त्यामुळे सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पहायला मिळतंय. पण येत्या काळात ही किंमत वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *