Maharashtra HSC Result 2021 : बारावीचा निकाल उद्या जाहीर होण्याची शक्यता

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुलै । Maharashtra HSC Result 2021 Date Time : दहावीचा निकाल आठवड्यात लागल्यानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. यासंदर्भात महत्वाची माहिती हाती आली असून उद्या बारावीचा दुपारी निकाल लागणार लागण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना 31 जुलैपर्यंत निकालाची घोषणा करण्याचे आदेश दिले आहेत. आज बहुतांश राज्यात बारावीचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्रातील बारावीचा निकाल कधी लागणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उद्या निकाल लागणे अपेक्षित आहे. सध्या राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराने मोठे नुकसान झाले आहे, या परिस्थितीत निकाल लावयाचा की नाही यावर सध्या चर्चा सुरू आहे.

यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता बारावी परीक्षा रद्द करुन दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण एकत्र करुन अंतर्गत मूल्यपामनद्वारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता बोर्डाकडे शाळांनी तयार केलेले निकाल आलेत त्यावर प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळं या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता आहे. आज बारावीच्या निकालाची तारीख बोर्डाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे.

बारावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर बारावीचे निकाल जाहीर करताना दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्गाचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यासाठी 30 :30 :40 असा निकष राज्य मंडळाने जाहीर केला आहे. यामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण (30%),अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (30%) आणि इयत्ता बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा ,सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (40%) अशा प्रकारचे गुण एकत्र करून बारावीचे निकाल जाहीर केले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *