Gold Silver Price Today : सोन्या-चांदी दरात वाढ ; दोन दिवसात सोने 320 रुपयांनी तर चांदी 1010 रुपयांनी वधारली

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ जुलै । मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) च्या व्यवहारानुसार गेल्या दोन दिवसांत सोन्या-चांदीच्या दराला चांगलीच झळाळी आल्याचं दिसून आलंय. सोन्याच्या दरामध्ये 30 जुलैला 310 रुपये तर आज पुन्हा 10 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव हा 48,390 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,390 रुपये इतका आहे. चांदीच्याही दरामध्ये 30 जुलैला 1000 रुपयांची तर आज पुन्हा 10 रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीसाठी आता 68,210 रुपये मोजावे लागणार आहेत.

गेल्या काही दिवसात सोन्याच्या दराने पुन्हा एकदा 50 हजारांकडे प्रवास सुरु केला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या किंमतीने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय.

अनेकांसाठी सोन्यात गुंतवणूक करणं हा सुरक्षित आणि हमी देणारा असा पर्याय आहे. सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सातत्यानं होणारी घसरण पाहता गुंतवणूकदारांचा कल या पर्यायाकडे वाढला आहे.

चांदीच्या किंमतीचा विचार करता 27 जुलैला त्यामध्ये 400 रुपयांची घसरण झाली होती तर 28 जुलैला त्यामध्ये 700 रुपयांची घसरण झाली होती. त्यानंतर 29 जुलैला 800 रुपये तर 30 जुलैला 1000 रुपयांची वाढ झाली आहे. आज पुन्हा त्यामध्ये 10 रुपयांची वाढ दर्शवली गेलीय. गेल्या महिन्यापासून चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होत असल्याचं दिसून येतंय. गेल्या महिन्यात, 1 जून रोजी चांदीची किंमत ही 72,600 रुपये इतकी होती. त्यानंतर किंमतीत घट होऊन ती 70 हजारांच्या आत आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *