आता LPG कनेक्शनवर कुटुंबाला हा लाभ मोफत मिळणार; पहा संपूर्ण माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट । नवीन एलपीजी कनेक्शन घेणे हे आता ऑनलाईन खरेदी करण्याइतकेच सोपे झालेय. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यात बेसिक गॅस कनेक्शनवर जी सबसिडी उपलब्ध आहे, त्याच आधारावर घेतलेल्या इतर कनेक्शनवरही सबसिडीचा लाभ मिळणार आहे.

उज्ज्वला योजनेअंतर्गत अशा प्रकारचे गॅस कनेक्शन बुक केले जाऊ शकतात. आपल्याला फक्त आपले आधार कार्ड आणि जुन्या गॅस कनेक्शनशी संबंधित कागदपत्रांची प्रत गॅस एजन्सीला द्यावी लागेल आणि नवीन गॅस कनेक्शनसाठी अर्ज करावा लागेल.

एकाच पत्त्यावर अनेक गॅस कनेक्शन घेतले जाऊ शकतात. सर्व गॅस कनेक्शन आधारशी जोडलेले असल्याने कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला वाव नाही. सरकार एकाच पत्त्यावर अनेक गॅस कनेक्शनची सुविधा सतत विस्तारत आहे. ऑनलाईन अर्ज किंवा एलपीजी गॅस कनेक्शन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया देखील अगदी सोपी झालीय.

या सुविधेअंतर्गत जर आई -वडील, भावंड किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही नातेवाईकाच्या नावाने आधीच गॅस कनेक्शन घेतले गेले असेल, तर कुटुंबातील इतर सदस्यही या पत्त्याचा लाभ घेऊ शकतात. फक्त या पत्त्याची पडताळणी करावी लागेल. ज्या कुटुंबाला गॅस सिलिंडर येते त्या तेल पुरवठा कंपनीच्या गॅस एजन्सीकडे जाऊन मूळ गॅस कनेक्शनशी संबंधित कागदपत्रे द्यावी लागतील. पडताळणीनंतर नवीन गॅस कनेक्शन उपलब्ध होईल.

परंतु आता जर तुम्हाला कोणत्याही कारणामुळे एलपीजी गॅस कनेक्शन घेण्यात समस्या येत असेल, तर तुमची चिंता आता दूर झालीय. जर तुमच्या कुटुंबातील कोणाला एलपीजी कनेक्शन असेल, तर तुम्हाला गॅस कनेक्शनही सहज मिळेल. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अॅड्रेस प्रूफ देण्याची गरज नाही. तेल पुरवठा कंपन्यांनी ही सुविधा ग्राहकांना दिली आहे. याचा लाभ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गतही घेता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *