सोने झाले आणखी स्वस्त, जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । कमॉडिटी बाजारात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीमध्ये मोठी घसरण झाली आहे. आज सोमवारी कमाॅडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ६५० रुपयांनी कमी झाला असून तो ४६ हजारांखाली आला आहे. चांदीमध्ये देखील १३०० रुपयांची घसरण झाली आहे. एक किलोचांदीचा भाव ६३९४० रुपये झाला आहे.

सलग दुसऱ्या सत्रात सोने आणि चांदीला विक्रीची झळ बसली आहे. याआधी शुक्रवारी सोने ९५२ रुपयांनी स्वस्त झाले होते तर चांदीमध्ये २०२३ रुपयांची घसरण झाली होती. दोन सत्रात सोने १६०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. यामुळे ग्राहकांसाठी सोने खरेदीची संधी असल्याचे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे.

सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर १० ग्रॅम सोन्याचा भाव ४५९५६ रुपये आहे. त्यात ६५० रुपयांची घसरण झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ६३६१४ रुपये असून त्यात १३८६ रुपयांची घसरण झाली आहे. याआधी शुक्रवारी बाजार बंद होताना सोने ४६६५१ रुपयांवर स्थिरावले. त्यात ९५२ रुपयांची घसरण झाली होती. त्याआधी सोन्याचा भाव ४६५५६ रुपयांपर्यंत खाली आला होता. सोन्याबरोबरच शुक्रवारी एक किलो चांदीचा भाव तब्बल २००० रुपयांनी स्वस्त झाला असून तो ६५ हजारांखाली आला होता.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५६९० रुपयांपर्यंत खाली घसरला. २४ कॅरेटचा भाव ४६६८० रुपये झाला आहे. दिल्लीत आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५९८० रुपये इतका झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०१६० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४३८० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८४२० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६३३० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९०३० रुपये आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *