मुंबईत नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा, 7 ठिकाणी आयोजकांवर गुन्हे दाखल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० ऑगस्ट । केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad Yatra) कालपासून सुरू झाली आहे. मात्र या जन आशीर्वाद यात्रेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविडच्या (Covid 19) पार्श्वभूमीवर गर्दी जमवायला परवानगी नसताना देखील भाजपनं (BJP) जन आशीर्वाद यात्रा काढली. या पार्श्वभूमीवर मुंबईत (Mumbai) 7 ठिकाणी आयोजकांवर गुन्हे दाखल झालेत.

काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबईतून सुरुवात झाली. विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर, गोवंडी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत. जन आशीर्वाद यात्रेची परवानगी नसतानाही ती काढल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मंगळवारी संध्याकाळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी भाजपच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालयापासून जनआशीर्वाद यात्रा काढली होती. या यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने एनआरआय पोलिसांनी आयोजकांसह 70 ते 80 भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्याचं समजतंय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *