महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ऑगस्ट । राज्यातील महत्वाच्या महापालिका आणि नगर परिषद निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या रुपात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर हे पक्ष स्वतंत्र लढण्याचीच शक्यता अधिक आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत त्या त्या जिल्ह्यात अधिकारी देणार असल्याचं अजित पवार म्हणाले. (Important statement of Deputy CM Ajit Pawar regarding local body elections)
प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे. सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र सरकार चालवत आहेतत. राज्य स्तरावरच्या आणि इतर महत्वाच्या निवडणुका लढवण्याबाबत वरिष्ठ पातळीवरचे नेते निर्णय घेतात. स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत त्या त्या जिल्हात अधिकार देणार. याबाबत उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, छगन भुजबळ आम्ही सर्वजण बैठक घेऊन निवडणुकाबाबत दिशा ठरवू, असं अजित पवार म्हणाले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षांसह 4 जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केलीय. या कारवाईबाबत महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात येतोय. विरोधकांच्या या आरोपांना अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. ही कारवाई सूडबुद्धीने झालेली नाही. जर तुम्ही भ्रष्टाचार केला नाही तर तुम्ही त्यात सापडू शकता का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केलाय. सूडबुद्धीनं कारवाई हे चुकीचं वक्तव्य आहे. त्याला काही अर्थ नाही, असं अजित पवार म्हणाले.