या चुकीमुळे मिळत नाही ड्रायव्हिंग लायसन्स, चाचणीदरम्यान हे लक्षात ठेवा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ ऑगस्ट । ड्रायव्हिंग लायसन्स बनवताना RTO मध्ये वाहन चालवतानाची परीक्षा द्यावी लागते. तीसुद्धा RTO च्या मापदंडांसह परीक्षा द्यावी लागते. ही चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरच ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाते. त्याचबरोबर अलीकडेच सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी नवीन नियम लागू केलेत, त्यानंतर सरकारने ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणाऱ्या राज्यांमध्ये आरटीओची संख्या वाढवत आहे. दुसरीकडे परवाना मिळविण्यासाठी चाचणीमध्ये आणखी अनेक मापदंड जोडत आहे.

ड्रायव्हिंग लायसन्सच्या चाचणी अहवालातील अपयशाचे मुख्य कारण शोधण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देशभरातील आरटीओमध्ये चाचपणी केली. तेव्हा 31 टक्के वाहने असल्याची माहिती समोर आली, चारचाकींच्या चाचणीदरम्यान बरेच जण गाडी रिव्हर्स घेताना चूक करतात. म्हणजेच समोरून वाहन चालवताना ते बरोबर वाहन उजवीकडे आणि डावीकडे वळवतात, पण जेव्हा रिव्हर्स घ्यायची वेळ येते तेव्हा ते त्यात चूक करतात आणि असे करणाऱ्यांची टक्केवारी 31 आहे.

काही दिवसांपूर्वीच नवीन नियम आणि उत्तीर्णतेच्या टक्केवारीवर सभागृहात लेखी उत्तराद्वारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ‘ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी अर्जदाराकडे कमीत कमी 69 टक्के गुण असणे आवश्यक आहे, तरच तो पुढील परीक्षेसाठी पात्र होईल. यासह अर्जदाराकडे काही विशेष कौशल्ये असणे आवश्यक आहे, जसे की वाहन उजवीकडे-डावीकडे किंवा रिव्हर्स करणे आणि मर्यादित अंतराने उजवीकडे चालवणे अशा गोष्टींकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले.

ही एक नवीन चाचणी असेल
परीक्षा देण्यासाठी नियुक्तीदरम्यान अर्जदाराला फक्त एक व्हिडिओ लिंक प्रदान केली जाईल, ज्यात ड्रायव्हिंग टेस्टची संपूर्ण माहिती असेल. याशिवाय ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकवर एलईडी स्क्रीनद्वारे चाचणीचा डेमो अर्जदाराला दाखवला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *