नारायण राणेंना मोठा धक्का, नारायण राणेंचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला ,कारवाई अटळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑगस्ट । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेले प्रक्षोभक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चांगलेच भोवले आहे. या वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणेंना अटक करण्यासाठी कारवाई सुरू केली होती. दरम्यान, नारायण राणे यांना कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. या प्रकरणात नारायण राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी रत्नागिरी कोर्टात दाखल केलेला अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहेत. त्यामुळे नारायण राणे यांच्यावरील अटकेची कारवाई अटक आहे. मात्र नारायण राणे यांनी रत्नागिरी कोर्टाच्या निकालाविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. (Narayan Rane’s bail application rejected by court)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलताना केलेल्या विधानाचा संदर्भ देत नारायण राणेंनी काल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. रायगडमध्ये नारायण राणेंनी हे चिथावणीखोर विधान केल्यानंतर महाड, नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेलं विधान हे संपूर्ण राज्याचा अपमान करणारं आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली होती.

नारायण राणेंच्या विरोधात कलम ५००, ५०२, ५०५, १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणेंच्या विधानानं समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी आशयाची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नाशिक पोलिसांनी राणेंच्या अटकेचे आदेश काढले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *