महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑगस्ट । केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रभर वादंग माजले आहे. संपूर्ण राज्यात राणे तसेच भाजपविरोधात शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्त आक्रमक झाले आहे. या वक्तव्यामुळे राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राणे यांच्या प्रकृतीबाबतीत एक मोठी माहिती समोर आली आहे.राणे यांची प्रकृती बिघडली असून त्यांना बीपी आणि शुगरचा त्रास जाणवत आहे. राणे लवकरच रुग्णालयाच दाखल होण्याची शक्यता आहे. तशी माहिती भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिलीय. (central minister Narayan Rane arrested for controversial comment on Uddhav Thackeray Narayan Rane facing sugar and blood pressure soon may shift to hospital)
नारायण राणे यांना अटक करण्यात आलं आहे. मात्र, त्यांची प्रकृती बिघडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांच्या शरीरातील साखरेचे तसेच रक्तदाबाचे प्रमाण वाढले आहे. प्रकृती अस्वास्थायमुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले जाण्याची शक्यता आहे. सध्या त्यांना अटक झाली असली तरी डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली आहे.