महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑगस्ट । इंग्लंड आणि भारत यांच्यात तिसरी कसोटी उद्या २५ ऑगस्टपासून लीड्स येथे सुरू होणार आहे. भारताने ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या विजयामुळे भारताचा आत्मविश्वास उंचावला आहे. मालिकेतील पहिल्या दोन्ही कसोटी भारताची कामगिरी शानदार झाली. पण मधळ्या फळीतील कामगिरी चिंताजनक आहे. विशेषत: चेतेश्वर पुजाराच्या कामगिरीवर सर्वांनी टीका केली आहे. आता तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ व्यवस्थापन संघात काय बदल करतोय का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या चर्चेनुसार मधळ्या फळीत पुजाराच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी दिली जाऊ शकते. त्याच बरोबर आर अश्विनला संघाबाहेर ठेवल्यामुळे टीका झाली होती. अशात विकेट घेण्यास अपयशी ठरलेल्या रविंद्र जडेजाच्या जागी आर अश्विनला संधी दिली जाऊ शकते.
असा असू शकतो भारताचा संभाव्य संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा/ सूर्यकुमार यादव, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (विकेटकीपर), आर अश्विन, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि जसप्रीत बुमराह