नोंदणीसाठी अखेरचा आठवडा शिल्लक ; आयटीआय प्रवेशाला अल्प प्रतिसाद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑगस्ट । व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून सुरू असलेल्या आयटीआय प्रवेशाला अद्याप विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. प्रवेश नोंदणीची प्रक्रिया 31 ऑगस्टला संपणार असून आतापर्यंत 2 लाख 23 हजार 444 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यातील 2 लाख 17 हजार 297 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज कन्फर्म झाले आहेत. प्रवेश नोंदणीसाठी आठवडाभराचा कालावधी शिल्लक असून या मुदतीत नोंदणी करून प्रवेशअर्ज कन्फर्म करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, असा विश्वास व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज कन्फर्म करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या 3 लाख 32 हजार 218 इतकी होती. यंदा आज 24 ऑगस्टपर्यंत 2 लाख 17 हजार 197 विद्यार्थ्यांचेच अर्ज आले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा 1 लाख 14 हजार 921 हून कमी अर्ज आले आहेत. आयटीआय प्रवेशाला ग्रामीण भागात फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र आहे.

जिल्हा वर्ष 2020 वर्ष 2021

मुंबई 6410 5180

ठाणे 10,105 8731

रायगड 7004 6558

पालघर 6114 4607

रत्नागिरी 4498 3739

सिंधुदुर्ग 2210 1946

पुणे 15,856 10.880

नाशिक 18,332 12,450

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *