होंडाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, पर्यायी बॅटरीसह देते १३० किमी पर्यंतीची रेंज!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 25 ऑगस्ट । सध्या इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी अधिकाधिक झपाट्याने वाढतेय. या करिता होंडा ने अलीकडेच आपली इलेक्ट्रिक स्कूटर U-Go ही बाजारात आणली आहे. दरम्यान ही होंडाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर असून होंडा यू-गो इलेक्ट्रिक स्कूटर चीनमध्ये लॉंच करण्यात आली आहे. होंडाच्या या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ७४९९ युआन जवळपास ८६,००० रुपये इतकी भारतीय किंमत आहे. तर होंडाची चीनी उपकंपनी युआंग होंडाने ही स्कूटर लाँच केली आहे.

दोन व्हर्जनमध्ये होंडाची U-Go इलेक्ट्रिक स्कूटर –
होंडा U-Go इलेक्ट्रिक स्कूटर दोन व्हर्जनमध्ये आली आहे. होंडाच्या या इलेक्ट्रिक स्कूटरच्या टॉप-स्पेसिफिकेशन व्हर्जनमध्ये १.२kW मोटर असून मॅक्सिमम आउटपुट १.८kW आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप-स्पीड ५३ किलोमीटर प्रति तास आहे. तर, स्टँडर्ड U-Go इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ०.८kW मोटर असून टॉप-स्पीड ४५ किलोमीटर प्रति तास आहे.

पर्यायी बॅटरीसह 130 किमी पर्यंतची रेंज-
होंडा यू-गो इलेक्ट्रिक स्कूटरच्या दोन्ही व्हर्जनमध्ये १.४४ केडब्ल्यूएच लिथियम-आयन बॅटरी वापरण्यात आली आहे, जी एकदा चार्ज केल्यानंतर ६५ किलोमीटर पर्यंत रेंज देते. मात्र दुसर्‍या पर्यायी बॅटरीसह इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज ही १३० किलोमीटर पर्यंत वाढवता येते. भारतात अलिकडेच लाँच झालेली Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर स्टँडर्ड व्हर्जनमध्ये १२१ किलोमीटरची रेंज देते, तर Pro मॉडलमध्ये १८१ किलोमीटरपर्यंत रेंज देते.

स्कूटरला देण्यात आलं USB चार्जिंग पोर्ट
होंडाच्या U-Go इलेक्ट्रिक स्कूटरला फुल LED-लायटिंग, मेन क्लस्टरसोबत एक LED DRL स्ट्रिप मिळते. यातील LCD इंस्ट्रुमेंट क्लस्टरद्वारे रेंज, बॅटरी स्टेटस, रायडिंग मोड आणि स्पीड अशी बेसिक इन्फॉर्मेशन मिळते. स्कूटरमध्ये USB चार्जिंग पोर्ट आणि अँटी-थेफ्ट अलार्म देखील आहे. भारतात ही इलेक्ट्रिक स्कूटर कधीपर्यंत लाँच होईल याबाबत मात्र अद्याप कंपनीकडून कोणतीही अधिकृत मिळालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *