महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑगस्ट । कोव्हीडमुळे अद्याप मंदिर देवदर्शनासाठी खुले नसले, तरी घराघरात हा उत्सव मोठ्या उत्साहात केला जातो. देवघरातल्या बाळकृष्णाला छोटासा पाळणा करून त्यात जन्माच्या मुहूर्तावर पाळण्यात जोजवले जाते. नवीन वस्त्र परिधान केली जातात. हार घातला जातो. लोणी किंवा दही साखरेची वाटी देवासमोर ठेवली जाते. गुलाल, फुलं उधळून कृष्णाचा जयघोष केला जातो. केळं, पेढे, पंजिरीचा नैवेद्य दाखवला जातो. अनेक भाविक या दिवशी उपास करतात व दुसऱ्या दिवशी गोपाळकाल्याचा प्रसाद ग्रहण करून उपास सोडतात. अंधःकारात प्रकाशाची वाट दाखवणारा, दैत्यांचा कर्दनकाळ ठरणारा, आपल्या बासुरीने सर्वांना मोहून टाकणारा आणि जगाला तत्वाज्ञाचे ज्ञानामृत पाजणारा भगवान श्रीकृष्ण याचा जन्मसोहळा अर्थात जन्माष्टमीचा उत्सव आपण दरवर्षी साजरा करतो. यंदाही हा उत्सव ‘गोविंदा रे गोपाळा’ या गजरात पार पडणार आहे.
श्रावण वद्य अष्टमीला पूर्वरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. ही वेळ रात्री १२ वाजून ४० मिनिटे गृहीत धरली जाते. त्या मुहूर्तावर कृष्णाचा जयघोष करून जन्म झाला असे कथा कीर्तनातून घोषित केले जाते. फटाके फोडून, वाद्य वादन, टाळ-नामाचा गजर करून कृष्ण जन्म झाल्याची वर्दी दिली जाते. या वर्षी हा उत्सव ३० ऑगस्ट २०२१, सोमवारी साजरा केला जाईल.
कृष्णजन्माचा मुहूर्त :
२९ ऑगस्टच्या रात्री ११. २५ ते ३० ऑगस्टच्या रात्री १.५९ पर्यंत राहील अष्टमीची तिथी राहील.
30 ऑगस्टच्या रात्री ११.५९ ते १२. ४४ मिनिटांपर्यंत असेल कृष्ण जन्माचा उत्सव साजरा केला जाईल.
यात पूजेचा कालावधी फक्त ४५ मिनिटांचा असेल.