Gold Silver Price Today ; जाणून घ्या आजचे सोने -चांदी दर ; किंमतीमध्ये बदल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑगस्ट । या महिन्याच्या सुरुवातीपासून सोने आणि चांदीचे भाव कमी झाले आहेत. ज्यांना सोन्या-चांदीचे दागिने बनवायचे आहेत त्यांच्यासाठी हीच योग्य वेळ आहे असही म्हंटलं जात आहे. २२ ग्रॅम कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत आज २७० रुपयांनी घसरून ४६,२२० रुपये झाली आहे. मागील ट्रेडमध्ये, मौल्यवान धातूची किंमत ४६,४९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६३,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे संपूर्ण भारतात सोन्याच्या दागिने किंमतीमध्ये बदल दिसून येतो.

२४ कॅरेट सोन्याचा दर २७० रुपयांनी घसरून ४७,२०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४६,२०० रुपये झाला आहे तर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४७,२०० एवढा झाला आहे. पुण्यामध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,४९० प्रति १० ग्रॅम आहे तर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४८,७१० रुपये इतका आहे. सोन्याच्या बाजारपेठेतलं आणखीन एक महत्त्वाच शहर म्हणजे नागपूर. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४७,२०० रुपये आहे आणि २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४६,२०० रुपये एवढा आहे. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४८,७१० आहे व २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४५,४९० रुपये एवढा आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत चांदीचे दर कमी आहेत. २००८ नंतर चांदीचे दर वाढले. तथापि, गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्यात काही खास बदल झालेच नाहीत. २०१८ मध्ये, मुंबईत सोन्या -चांदीच्या किंमतींमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली कारण गुंतवणूकदारांनी शेअर्स विकले आणि सोने आणि चांदी खरेदी केले. गुडरिटर्नस या वेबसाईटनुसार आजचा मुंबईतील चांदीचा दर १० ग्रॅमसाठी ६३२ रुपये आहे. पुण्यासाठी १० ग्रॅमसाठी दर ६३२ रुपये असा आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *