महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑगस्ट । आजपासून रत्नागिरीतून (Ratnagiri)केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad Yatra) सुरू झाली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. यावेळी राणे युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर निशाणा साधला आहे.
वरुण सरदेसाई यांनी नारायण राणेंच्या घराबाहेर जाऊन आंदोलन केलं होतं. त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, वरून सरदेसाई आमच्या घरावर येऊन हल्ला करतो. त्याच्यावर अजून कारवाई केली नाही. यापुढे आमच्या घरावर जो चालून येईल त्याला परत जाता येणार नाही. वरून सरदेसाई कसा येतो आणि परत जातो आम्ही पाहतोच.
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे" असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या रत्नागिरीतील जन्मस्थानी भेट देत जन आशीर्वाद यात्रेच्या कोकण दौऱ्यादरम्यान टिळकांच्या पवित्र स्मृतींना उजाळा दिला.#JanAshirwadYatra pic.twitter.com/V143wABzaM
— Narayan Rane (@MeNarayanRane) August 27, 2021
पुढे नारायण राणे म्हणाले की, आमच्या घरावर हल्ला करतो त्याला अटक होत नाही, तो नातलग आहे. काय आणून देतो, त्यामुळे त्याची एवढी वट. कुठल्याही नेत्याला जो पोलीस बंदोबस्त नाही तेवढा त्याला आहे. आता परत आला तर परत नाही जाणार, आमच्या घरावर कोणी येईल, आम्ही नाही सोडणार. आणि तो वरुण येऊ देच, असा इशाराच नारायण राणे यांनी दिलाआहे.
पुन्हा एकदा नारायण राणेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं आहे. ते म्हणाले की, आपल्या बंधूच्या वहिणीवर कोणी ॲसिड फेकण्यास सांगितल? मी जुन्या गोष्टी सर्व बाहेर काढणार. रमेश मोरे हत्या कोणी केली ? का केली ? जया जाधवची हत्या कशी झाली? आम्हालाही जुनी प्रकरणं माहीत आहेत. सुशांत सिंह आणि दिशा सालियान यांची केस अजून संपली नाही. माझा आवाज व्यवस्थित झाला कि खणखणीत वाजवणार, असं ते म्हणालेत.
मी केंद्रात मंत्री आहे. जरा आठवण करा. रिस्ट्रिक्शन देऊन काय करणार. अटक? किती दिवस. तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे हे लक्षात ठेवा, असंही नारायण राणे रत्नागिरीत भाजप कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणालेत. आज राणे रत्नागिरीनंतर सिंधुदुर्गात जाऊन या यात्रेचा समारोप करणार आहेत.
मी बोललो ते योग्य बोललो. एका दरोडेखोराला अटक करतात तस मला अटक करण्यात आली. त्यासाठी दोन अडीचशे पोलीस आणले. वाह काय पराक्रम आहे, असंही राणेंनी म्हटलं आहे.
मी 39 वर्षे सोबत काम केलं ; पुढे राणे म्हणाले की, धमक्या नारायण राणे यांना देऊ नका. मी 39 वर्षे सोबत काम केलं आहे. खूप मसाला माझ्याकडे आहे. अनेक जुनी प्रकरणं मला माहीत आहेत.