Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
उद्यापासून SBI देतंय स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी - Maharashtra 24

उद्यापासून SBI देतंय स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 29 ऑगस्ट । जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एसबीआयने (SBI)एक चांगली संधी आणली आहे. बँक ३० ऑगस्टपासून डिजिटल गोल्ड (Sovereign Gold Bonds) मध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय देत आहे, ही गुंतवणूक ३ सप्टेंबरपर्यंत चालू असणार आहे. या बाँडसाठी अर्ज करण्यासाटी पाच दिवस असणार आहेत.

दरम्यान, भारतीय रिर्झव्ह बँकेने (RBI) शुक्रवारी सांगितले की, सरकारी गोल्ड बाँडच्या पुढील हप्त्यांसाठी किंमत प्रति ग्रॅम ४,७३२ रुपये निश्चित करण्यात आली आहे. अर्जासाठी ३० ऑगस्टपासून पाच दिवस बाँड उघडेल. सरकारी सुवर्ण योजना २०२१-२२ ही मालिका ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२१ या कालावधीत सहा वर्गणींसाठी सुरू होईल.

सरकारने आरबीआयशी सल्लामसलत करून ‘ऑनलाइन’ अर्ज करून डिजिटल पद्धतीने पैसे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना ५० रुपयांची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने सांगितले की, गोल्ड बाँडची किंमत प्रति ग्रॅम ४,७३२ रुपये आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, अशा गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बाँडची किंमत प्रति ग्रॅम ४,६८२ रुपये असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *