Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
दहीहंडी साजरी करण्याच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक ; अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात - Maharashtra 24

दहीहंडी साजरी करण्याच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक ; अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑगस्ट । दहीहंडी साजरी करण्याच्या मुद्द्यावर मनसे अधिक आक्रमक झाली आहे. दहीहंडी साजरी करता यावी म्हणून मनसेचे ठाणे-पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज आमरण उपोषण सुरू केले. मात्र, पोलिसांनी जाधव यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांना नौपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. (MNS determined to celebrate Dahi Handi, avinash jadhav detained by thane police)

मनसेने दहीहंडी साजरी करता यावी म्हणून नौपाडा येथील भगवती मैदानात स्टेज बांधला होता. या ठिकाणी मनसेचे नेते अविशान जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. तसेच ठिय्या आंदोलनही सुरू करण्यात आलं होतं. मात्र, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी जाधव यांनी घटनास्थळी जावून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मनसे सैनिकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची एक तुकडी घटनास्थळी आली होती. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवला.कोव्हिडच्या नियमांचे उल्लंघन करत दहीहंडी साजरी करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांची तयारी सुरू होती, असं पोलिसांकडून सांगण्यात येतं. तर आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. दहीहंडी साजरी होणारच. आम्ही कायदा हातात घेतला नाही. आम्हाला नियम द्या, आम्ही नियमांचं पालन करून दहीहंडी साजरी करायला तयार आहोत, असं जाधव यांनी सांगितलं.

स्टेज तोडणार
दरम्यान, दहीहंडी साजरी करण्यासाठी मनसेने भगवती मैदानात स्टेज बांधला आहे. हा स्टेज पोलिसांकडून तोडण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं. त्यासाठी पोलिसांनी मैदानात कुमक मागवल्याचंही सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे मनसे आणि पोलीस आमनेसामने येण्याची चिन्हे दिसत आहे.

युवासैनिकांना कोरोना होत नाही का?
दहीहंडी उत्सवावर जरी सरकारने निर्बंध घातले असले तरी मनसेकडून आयोजित करण्यात आलेला दहीहंडी उत्सव आम्ही साजरा करणारच अशी भूमिका मनसेने घेतली आहे. मनसेने अगदी मोजक्याच ठिकाणी योग्य ती काळजी घेऊन हे आयोजन केलेलं होत. मात्र मुख्यमंत्री फक्त हिंदू सणांवर निर्बंध घालतात. त्यापेक्षा उपाययोजना केल्या असत्या तर बरं झालं असत अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा असो किंवा शिवसेनेने केलेली आंदोलन असो त्यावेळी कोरोना कुठे गेला होता? शिवसैनिकांना कोरोना होत नाही का? असा सवालही त्यानी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *