मथुरेत दारू आणि मांस विक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑगस्ट । मथुरा शहरात मांस आणि दारूविक्रीवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सोमवारी हा निर्णय जाहीर केला आहे. मथुरेतील वृंदावन, गोवर्धन, नंदगाव, बरसाना, गोकुळ, महावन आणि बलदेव भागात मांस आणि दारूविक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच या व्यवसायाशी निगडित व्यापारी आणि कामगारांचे इतर व्यवसायात पुर्नवसन केले जाईल असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. श्रीकृष्ण जन्मोत्सव निमित्त योगी आदित्यनाथ मथुरेत आले होते. तेव्हा एका कार्यक्रमात त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

योगी आदित्यनाथ म्हणाले की, चार वर्षापूर्वी मथुरा, वृंदवन नगर यांची एक महानगरपालिका व्हावी अशी मागणी करण्यात आली होती, त्यानुसार इथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली. नंतर सात पवित्र स्थळांना तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात आला. या पवित्र ठिकाणी दारू आणि मांस विक्रीवर बंदी घालण्यात यावी अशी जनतेची इच्छा होती. त्याप्रमाणे मथुरेत मांस आणि दारू विक्रीवर बंदी घालण्यात आहे. जिल्हा प्रशासनला कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *