दक्षिण आफ्रिकेचा जलद गोलंदाज डेल स्टेनची क्रिकेटमधून निवृत्ती

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑगस्ट । दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी जलद गोलंदाज डेल स्टेनने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. स्टेनने सोशल मीडियावरून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३८ वर्षीय स्टेनने आफ्रिकेकडून ९३ कसोटी, १२५ वनडे आणि ४७ टी-२० सामने खेळले आहेत.

स्टेनने २००४ साली दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने ९३ कसोटीत १ हजार २५१ धावा तर ४३९ विकेट घेतल्या आहेत. ५१ धावा देत सात विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. कसोटी त्याने ५ वेळा १० विकेट तर २६ वेळा ५ विकेट घेतल्या आहेत. १२५ वनडेत स्टेनने १९६ विकेट घेतल्या. ३९ धावा देत ६ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर टी-२० मध्ये ४७ सामन्यात ६४ विकेट त्याने घेतल्या आहेत. ९ धावात ४ विकेट ही त्याची टी-२० मधील सर्वोत्तम कामगिरी आहे.

गेल्या काही काळापासून स्टेन दुखापतींना समोरे जात होता, त्यामुळेच त्याने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. याआधी त्याने कसोटी, वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती आणि टी-२० क्रिकेटवर फोकस केला होता. पण दुखापतीमुळे तो बऱ्यात महिन्यांपासून संघात स्थान मिळवू शकला नाही.

जगातील सर्वात वेगवान गोलंदाज आणि स्विंग करण्याची क्षमता असलेल्या स्टेनने २१ फेब्रुवारी २०२० रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच खेळली होती. २०१९ साली झालेल्या आयसीसी वनडे वर्ल्डकपच्या आधी दुखापतीमुळे तो स्पर्धे बाहेर झाला होता. त्यानंतर त्याने कसोटी आणि वनडेमधून निवृत्ती घेतली होती.

टी-२० मध्ये गेल्या काही काळात त्याने जगभरातील अनेक लीगमध्ये सहभाग घेतला होता. आयपीएलमध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, डेक्कन चाजर्स, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात लायन्स संघाकडून खेळला होता. या शिवाय तो पाकिस्तान, वेस्ट इंडिजमधील टी-२० लीगमधून खेळत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *