भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेनंतर हा दिग्गज गोलंदाज निवृत्ती घेणार ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑगस्ट । इंग्लंड आणि भारत यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याच्या आधी माजी जलद गोलंदाज स्टीव्ह हार्मिसन यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. भारताविरुद्ध होणारी पाचवी कसोटी जेम्स एडरसनच्या करिअरमधील अखेरची मॅच असेल. या मालिकानंतर तो निवृत्ती घेईल.

टॉकस्पोर्टशी बोलताना इंग्लंडचे माजी गोलंदाज हार्मिसन म्हणाले की, भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर जेम्स निवृत्ती घेईल. त्याची या मालिकेत फार चांगली कामगिरी झाली आहे. निवृत्ती घेण्यासाठीची ही सर्वोत्तम वेळ आहे. जगातील सर्वोत्तम फलंदाज विराट कोहलीला अडचणीत आणून जेम्स करिअरचा शेवट करू शकतो, यापेक्षा उत्तम काय असू शकते.

भारताविरुद्धची पाचवी कसोटी मॅनचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार आहे. हे जेम्सचे घरचे मैदान आहे. एखाद्या खेळाडूसाठी यापेक्षा सर्वोत्तम निरोप असू शकत नाही. मला अशी जाणीव होत आहे की जिमी त्यानंतर निवृत्ती घेईल. एडरसन सध्या ३९ वर्षाचा आणि त्याने या मालिकेत १३ विकेट घेतल्या आहेत.

भारताविरुद्धच्या मालिकेनंतर इंग्लंडला डिसेंबर महिन्यात अॅशेस मालिका खेळायची आहे आणि त्यासाठी बराच कालावधी शिल्लक आहे. जेम्सने तो सर्वोत्तम फॉर्ममध्ये असताना निवृत्ती घेतली तर चांगले ठरले.

स्टीव्ह हार्मिसन यांनी इंग्लंडकडून ६३ कसोटीत २२६ विकेट घेतल्या होत्या. वनडेत त्यांच्या नावावर ७६ विकेट आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *