कमी किंमतीचे बेस्ट Smartphones, जबरदस्त फिचर्स

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ सप्टेंबर ।

REDMI 9 Prime : रेडमी 9 प्राइम या फोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजच्या बेसिक मॉडेलची किंमत 9999 रुपये आहे. या फोनला MediaTek Helio G80 प्रोसेसर देण्यात आला असून, त्याला 6.53 इंच आकाराचा फुल HD+ डिस्प्ले आहे. रेडमी 9 प्राइम या स्मार्टफोनला 13MP + 8MP + 5MP + 2MP असा क्वाड रिअर कॅमरा सेटअप असून, 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. फोनची बॅटरी 5020mAh क्षमतेची आहे.

Tecno Spark 7T : या स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजच्या बेसिक मॉडेलची किंमत 9499 रुपये आहे. या फोनला मीडियाटेक हेलिओ G35 गेमिंग प्रोसेसर आणि 6.52HD+IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनला 6000mAh क्षमतेची मोठी बॅटरी आहे. या फोनला 3-इन-1 सिम स्लॉट असून, फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे. Android 11 सिस्टीमवर हा फोन चालतो. फोनला 48MP चा ड्युएल रिअर कॅमेरा आणि ड्युएल फ्रंट फ्लॅशसह 8MPचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy F02s : सॅमसंग कंपनीच्या या स्मार्टफोनच्या 3 जीबी रॅम आणि आणि 32 जीबी स्टोरेजच्या व्हॅरिएंटची किंमत 9499 रुपये आहे. हा सॅमसंगचा एंट्री-लेव्हल फोन असूनही, त्यात 6000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर असून, 6.5-इंच आकाराचा HD+ इन्फिनिटी-V डिस्प्ले देण्यात आला आहे. 13MP + 2MP + 2MP अशा क्षमतेचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप फोनला असून, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे.

Realme C21Y : या स्मार्टफोनला 6.5 इंचांचा HD प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचं रिझॉल्युशन 720×1600 पिक्सेल आहे. या फोनला ऑक्टाकोअर Unisoc T610 प्रोसेसर असून, ग्राफिक्ससाठी Mali-G52 GPU देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन नुकताच सादर झाला आहे. 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज अशा व्हॅरिएंटची किंमत 8999 रुपये असून, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज अशा व्हॅरिएंटची किंमत 9999 रुपये आहे. 5000 mAh क्षमतेची बॅटरी त्याला देण्यात आली आहे. या फोनला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यातला प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा आहे. 2 मेगापिक्सेलचा ब्लॅक अँड व्हाइट सेन्सर आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सरही त्यात देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा सेन्सरही देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून, ती रिव्हर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. फोनचा आकार 164.5x76x9.1mm असा असून, त्याचं वजन 200 ग्रॅम आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ व्ही 5, जीपीएस, 3.5 mm हेडफोन जॅक आणि चार्जिंगसाठी मायक्रो-यूएसबी पोर्ट आदी बाबी देण्यात आल्या आहेत. मॅग्नेटिक इंडक्टिव्ह सेन्सर, अॅम्बियंट लाइट सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर, अॅक्सलरोमीटर आदी सेन्सर्सही या फोनमध्ये देण्यात आले आहेत. फोनच्या बॅक पॅनेलवर फिंगरप्रिंट स्कॅनरही देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *