New Rules from 1st September : आर्थिक व्यवहार आणि नियमांत मोठे बदल, जाणून घ्या काय

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ सप्टेंबर । आजपासून 2021 वर्षातील नवव्या महिन्याला सुरुवात होत आहे. आज एक सप्टेंबर आजपासून दैनंदिन जीवनाशी निगडीत आर्थिक व्यवहारांत बदल होणार आहेत. तसेच काही नवे नियमही लागू होणार आहेत. हे बदल जीएसटी रिटर्न, PF UAN शी आधार लिकिंग, राजधानी ट्रेन आणि काही बँकांच्या व्यवहारांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. तसं पाहता हे सर्व नियम सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत. जाणून घेऊया या नियमांबाबत…

जीएसटी कलेक्शनमध्ये झालेली घट पाहता, सरकारनं उशिरा कर भरणाऱ्यांवर कडक दंड आकरण्याची तयारी केली आहे. सरकार जीएसटी धारकांनी GST भरण्यास विलंब केल्यास 1 सप्टेंबरपासून निव्वळ करावर व्याज आकारणार आहे. यासोबतच वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) भरण्यास उशीर केल्यास त्यावरील एकूण कर दायित्वावर व्याज आकारलं जाणार असल्याचं सांगितलं आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला, अनेक उद्योगांनी जीएसटी भरण्यास विलंब केल्यानं तब्बल 46,000 कोटी रुपयांचं थकीत व्याज वसूल करण्याच्या दिशेनं व्यक्त केली होती. व्याज एकूण दायित्वावर आकारण्यात आले होते. 19 सप्टेंबर रोजी जीएसटी दर आणि इतर मुद्द्यांवर सुधारणा करण्यासाठी परिषदेची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नुकसानभरपाई उपकर आणि नुकसान भरपाई देयक कमी करण्यावर विचार केला जाऊ शकतो.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) ईपीएफ खात्याला आधार क्रमांकासह पीएफ खाते आणि युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) ला जोडणं अनिवार्य केलं आहे. हे लिंक करण्यासाठी शेवटची तारिख 31 ऑगस्ट होती. म्हणजेच, जर तुम्ही काल (मंगळवार) पर्यंत आपल्या पीएफ खात्यात युनिवर्सल अकाउंट नंबर (यूएएन) नंबरशी लिंक केलं नाही, तर मात्र तुमच्या खात्यात कंपनीच्या वतीनं पैसे जमा होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. PF UAN आणि आधार लिंक करण्यासाठी देण्यात आलेली तारिख यापूर्वीच दोन वेळा वाढवण्यात आली आहे.

पंजाब नॅशनल बँकेनं एक सप्टेंबरपासून आपल्या बचत खात्यांवरील व्याजदरात घट केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, वार्षिक 2.90 टक्के व्याजदर देण्यात येणार आहे. बँकेच्या सर्व नवीन आणि जुन्या खातेधारकांना हा नियम लागू असणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *