महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ सप्टेंबर । महाराष्ट्राचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याबाबतची स्थिती, यासंदर्भात भाष्य केलं. शाळा सुरु करण्यासंदर्भा राज्य सरकारचा विचार सुरु असून त्यासंदर्भात लवकरचं निर्णय होईल, असं बच्चू कडू म्हणाले.
शाळा कधी सुरु होणार?
महाराष्ट्रातील शाळा सुरू करण्यासंदर्भात येत्या दोन दिवसात निर्णय घेतला जाणार आहे, मात्र इतर राज्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता, विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल, असंही बच्चू कडू यांनी यावेळी सांगितलं. शाळा सुरु करण्यासाठी टास्क फोर्सच्या सूचना लक्षात घेऊन एसओपीत बदल केल्यानंतर नवी कार्यप्रणाली जाहीर केली जाणार आहे.