महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ सप्टेंबर । इंग्लंडची पहिल्याच सत्रात ५ बाद ६२ अशी अवस्था झाल्यानंतर पोपे आणि बेअरस्टॉ यांनी डावाला आकार देत धावफलक हलता ठेवला आहे. त्यांनी ५७ चेंडूत ५२ धावांची भागीदारी भारतीय गोलंदाजांचा दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. बेअरस्टॉ सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत फलंदाजी करत आहे.
इंग्लंडने ३४ षटकांत ५ बाद ११९ अशी मजल मारली आहे. इंग्लंड अजूनही ७२ धावांनी पिछाडीवर आहे. उमेश यादवने तीन बळी घेतले आहेत, तर बुमराहने दोन बळी टिपले.
भारतीय संघाने चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दमदार सुरुवात केली. उमेश यादवने ओव्हरटनला बाद करत भारताला चौथे यश मिळवून दिले. डेव्हीड मलानलाही उमेश यादवने बाद करत इंग्लंडला पाचवा हादरा दिला. त्यामुळे काल नाबाद असलेली जोडी तंबूत परतली.