महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ सप्टेंबर । देशातील खराब हवेमुळे 40 टक्के भारतीयांचे आयुष्य 9 वर्षांनी कमी होऊ शकते असा दावा अमेरिकन अभ्यासात करण्यात आला आहे. शिकागो विद्यापीठाच्या ऊर्जा धोरण संस्थेने हा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार, नवी दिल्लीसह मध्य, पूर्व आणि उत्तर भारतात राहणाऱ्या 48 कोटींहून अधिक लोकांना प्रदूषणाच्या उच्च पातळीचा सामना करावा लागत आहे. खराब हवेमुळे देशातील लोकांना अनेक आजार होत आहे. देशात वायू प्रदुषणामुळे दरवर्षी कित्येक लोकांचा मृत्यू होता.
अहवालाच्या मते, भारतातील वायू प्रदूषण कालांतराने वाढतच गेले आहे. दिल्लीसह देशातील अनेक शहरांतील हवेची गुणवत्ताही कमी झाली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील हवेची गुणवत्ता कमी झाल्यामुळे त्या राज्यातील लोकांचे आयुष्य 2.5 ते 2.9 वर्षे कमी होऊ शकते असा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.
2019 मध्ये वायू प्रदूषणाच्या बाबतीत भारताची स्थिती वाईट
अहवालात म्हटले आहे की, 2019 मध्ये भारताची सरासरी ‘पार्टिक्युलेट मॅटर कंसन्ट्रेशन’ 70.3 मायक्रोग्राम प्रति क्यूबिक मीटर होती. जी जगातील सर्वात जास्त आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) 10 मायक्रोग्राम प्रति क्यूबिक मीटरच्या निर्देशांपेक्षा 7 पट अधिक आहे. यामुळे वायू प्रदूषणाच्या बाबतीत भारत कुठे आहे? या अहवालातून समजते.
राजधानी दिल्लीची परिस्थिती बिकट?
स्वित्झलँडमधील IQ Air नावाच्या एका संस्थेनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीने 2020 मध्ये सलग तिसऱ्यांदा जगातील सर्वात शहराचा दर्जा प्राप्त केला होता. IQ एअर हवेत PM 2.5 कणांच्या उपस्थितीवर आधारित हवेची गुणवत्ता मोजते. या कणांमुळे फुफ्फुसांचे मोठे नुकसान होते. यामुळे दिल्ली शहरातील जास्तीत जास्त लोकांना फुफ्फुसांच्या आजारांना बळी पडतात.