चिपी विमानतळावरून लवकरच टेक ऑफ,

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ सप्टेंबर । विमानतळ प्रवासी विमान उड्डाणास सज्ज झाला आहे. अलाएन्स एअर या विमान वाहतूक करणाऱया पंपनीनेही 7 ऑक्टोबरपासून प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याची तयारी दाखवली आहे. तसे पत्र विमान वाहतूक मंत्रालयाला दिले आहे. त्यामुळे उद्घाटनाच्या दृष्टीने योग्य ती तयारी करण्याचे आदेश सर्व संबंधित अधिकाऱयांना द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे संसदीय गटनेते, खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

चिपी विमानतळाचे काम जलदगतीने पूर्ण होऊन विमानसेवा सुरू व्हावी या दृष्टीने खासदार विनायक राऊत यांनी पेंद्रीय हवाई वाहतूक मंत्री तसेच संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. या विमानतळाचे काम पूर्ण झाले असून विमानतळ विमानोड्डाणास सज्ज झाला आहे.

या विमानतळाचे उद्घाटन 7 ऑक्टोबर रोजी करण्यात यावे व त्यादृष्टीने तयारी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱयांना द्यावेत, अशी मागणी खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब व खासदार अनिल देसाई उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *