दक्षिण भारतात कोरोनाने चिंता वाढवली; केरळमध्ये संक्रमणात मोठ्या प्रमाणात वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ सप्टेंबर । दक्षिण भारतात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाने चिंता वाढवली आहे. केरळमध्ये कोरोनाचे वाढते संक्रमण कमी होत नसून कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असताना केरळमध्ये मात्र रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. केरळमध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूदरही वाढत आहे. त्यामुळे केरळमध्ये कोरोनाने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

केरळमध्ये दररोज 30 हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. गेल्या 24 तासात केरळमध्ये 29,682 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 142 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केरळमध्ये वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय असून मृत्यूदरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इतर राज्याच्या तुलनेत केरळमध्ये संक्रमणाचा वेग वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज 150 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link