सोने-चांदी: सोन्याचा चांदीचा काय आहे आजचा दर ? जाणून घ्या

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ सप्टेंबर । २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ४७,२०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४७,२०० रुपये झाला आहे तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४६,२०० एवढा झाला आहे. पुण्यामध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४8,६१० प्रति १० ग्रॅम आहे तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४५,४०० रुपये इतका आहे. सोन्याच्या बाजारपेठेतलं आणखीन एक महत्त्वाच शहर म्हणजे नागपूर. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४७,२०० रुपये आहे आणि २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४६,२०० रुपये एवढा आहे. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४८,६१० आहे व २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४५,४०० रुपये एवढा आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत चांदीचे दर कमी आहेत. २००८ नंतर चांदीचे दर वाढले. तथापि, गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्यात काही खास बदल झालेच नाहीत. २०१८ मध्ये, मुंबईत सोन्या -चांदीच्या किंमतींमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली कारण गुंतवणूकदारांनी शेअर्स विकले आणि सोने आणि चांदी खरेदी केले. गुडरिटर्नस या वेबसाईटनुसार आजचा मुंबईतील चांदीचा दर १० ग्रॅमसाठी ६३६ रुपये आहे. पुण्यासाठी १० ग्रॅमसाठी दर ६३६ रुपये असा आहे. नागपूर आणि नाशिकमध्येही चांदीचा दर हा १० ग्रॅमसाठी ६३६ रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *