महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ सप्टेंबर । राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बजरंग खरमाटे यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग प्रकरणी नोटीस बजावली आहे. अनिस परब यांचे विश्वासू आरटीओ (प्रादेशिक परिवहन कार्यालय) अधिकारी बजरंग खरमाटे यांना ईडीने सोमवारी, 6 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावलं आहे. बजरंग खरमाटे यांनी ईडीने बजावलेली पहिलं समन्स आहे. यापूर्वी अनिल परब यांनाही चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीने नोटीस बजावले होते. आता अनिल परब यांचे जवळचे सहाय्यक यांना समन्स बजावले आहे. त्यामुळे अनिल पराब यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं चित्र आहे.
30 ऑगस्ट रोजी ईडीने बजरंग खरमाटे यांच्या नागपूर येथील घरावर छापेमारी केली होती. खरमाटे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावण्यात आला आहे. ईडीने काही कागदपत्रे ताब्यात घेतल्याचेही सांगितले जात आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली होती. नोटीसनुसार त्यांना मंगळवारी (ता. ३१) ईडीच्या कार्यालयात हजर राहायचे होते. मात्र, अनिल परब उपस्थित झाले नाही. मंत्रिपदाची जबाबदारी असल्याने काही ठरलेली कामे आहेत. त्यामुळे चौकशीसाठी हजर राहू शकत नाही, असे अनिल परब यांनी ईडी कार्यालयात कळवले.